दाऊद चे आवतन नितीनभाऊंना . . .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सकाळ झाली. दाऊद उठला. त्यासरशी त्याचे कमांडो अधिक सावध झाले. नेहमीच्या सवयीनुसार जगभरची ताजी वर्तमानपत्रे दाऊदची जणु वाटच पाहत होती. मुंबईत चाळीतील पेपर वाचायची त्याची सवय मोडली नव्हती आणि ती सुटतही नव्हती. खास ब्राझीलवरून मागवलेल्या कॉफी बियांची वाफाळती कॉफी घेत त्याने पेपर चाळायला सुरुवात केली. एकेक पेपरवरून तो नजरफिरवत होता. इतक्या वर्षांच्या सवयीने कोणत्या पेपरमध्ये कोणत्या पानावर कसल्या बातम्या असतात यावर त्याची पक्की नजर बसली होती. वर्तमानपत्रांत येणाºया बातम्यांपैकी बहुतेक सगळ्यांची त्याला आधीच माहिती असतात. कित्येक घटना त्याच्याशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंधीत असतात. ‘उद्योग’ क्षेत्रात त्याने मारलेल्या भरारीला अवघ्या जगानेच झुकून सलाम केला आहे. तरीही आपल्याला माहित असलेली माहिती कोणत्या पेपरने कशी दिली याची त्याला उत्सुकता असते. एखाद्या दिवशी आपले छायाचित्र एकाही वृत्तपत्रात नसेल तर त्याला कसे चुकल्याचुकल्यासारखे वाटते. एखाद्या घटनेबाबत प्रसिद्ध झालेल्या नेमका उलटा मजकूर वाचून तो मनाशीच हसतो. त्याच्या त्या गूढ हास्याची आता कमांडोंनाही सवय झालेली आहे. पेपरचे मुख्य पान पाहताना आज तो एकदम चक्रावला. आपलेच नाव ‘त्या’ बातमीत आहे ना! याची त्याने पुन:पुन्हा खात्री करून घेतली. एका स्वामींच्या बुद्धीमत्तेशी आपली तुलना थेट ‘पूर्ती’ वाल्या नितीनभाऊंनी केल्याचे वाचून तो उडालाच.
त्याने सगळे पेपर चाळले. सगळ्याच पेपरमध्ये आपल्या नावाची हेडलाईन म्हटल्यावर दाऊद चक्रावून गेला. त्याला ते स्वामी कोण याची उत्सुकता लागून राहीली. त्याची अस्वस्थ चर्या त्याच्या तैनातीत असलेल्या खास मनकवड्या कमांडोने ओळखली. त्याने लगेच समोरचा लॅपटॉप ओढला. त्या स्वामींच्या नावाने सर्च दिला. त्यांची ‘इमेज’ झळकल्यावर त्याने लॅपटॉप बॉसच्या समोर केला. ती छबी पाहून दाऊद आणखी गोंधळात पडला. त्या व्यक्तीला कोठे पाहिले आहे? हे त्याला आठवेना. तो अधिक अस्वस्थ झाला. प्राथमिक दर्शनातच ही व्यक्ती कोणीतरी महान व्यक्ती आहे हे त्याने ताडले. मग आपला आणि त्यांचा काय संबंध? हा प्रश्न त्याला सतावू लागला. आपला उद्योग जगभर पसरला असला तरी कोणीच आपल्याला चांगले म्हणत नाही ही खंत त्याला कायम सतावत असायची. त्यावर त्याने मध्यंतरी खूप चिंतन केले होते. अखेरीस, आपली महती जरी मोठी असली, तरी आपण जे काही करतो ते काही चांगले काम नाही, हे कटुवास्तव त्याने स्विकारले. काही दिवस प्रचंड अस्वस्थतेने त्याला घेरून टाकले. स्वत:ला बंद घरात कोंडून घेऊन तो आत्ममग्न झाला. अखेरीस आतल्या आवाजाने तो भानावर आला. या चक्रव्यूहातून सुटका नाही हे त्याने स्विकारले आणि तो पुन्हा एकदा कामाला लागला. हल्ली तो स्वत:ला आरशात बघायचेही टाळतो. अनेकदा त्याला आपल्या प्रतिबिंबाच्या जागी काळीकुट्ट छबी आरशात दिसते. हे भयाण प्रतिबिंब त्याला दिवसरात्र छळत असे. मध्यंतरीच्या काळात निराशेच्या खाईत सापडलेला दाऊद अलिकडच्या काळात सावरला होता. कोणत्याही घटनेवर बरी वाईट प्रतिक्रिया द्यायची नाही आणि जास्त विचारही करायचा नाही म्हणजे मन:स्थिती ठिक राहील असा त्याला अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञांनी सल्ला दिला होता. त्याचे तंतोतंत पालन करीत असल्याने अलिकडे त्याची मनस्थिती सुधारली होती. मन कसे पिसासारखे हलके हलके झाले होते.
इतके दिवस स्वस्थ असलेला दाऊद आज मात्र अतिशय अस्वस्थ झाला. जागतिक किर्तीच्या एका महान स्वामींच्या बातमीत आपला उल्लेख का आणि कसा? हेच त्याला समजेनासे झाले. अखेर, न राहवून त्याने थेट मुंबईत समरला फोन लावला. इतके वर्षे कोणाच्या तरी माध्यमातून अप्रत्यक्ष संपर्क साधणारा बॉस थेट आपल्यालाच आणि भल्या सकाळी फोन करतोय म्हटल्यावर समर हादरलाच्. त्याने अंगाला चिमटे काढून पाहिले. मोबाईल क्रमांकाच्या सुरूवातीचा 9२ आकडा पुन:पुन्हा तपासून पाहिला. या धावपळीत मोबाईलची रिंग काहीशी कर्कश्श वाजल्याचा त्याला भास झाला आणि त्याने पटकन फोन रिसिव्ह केला. तिकडून थेट दाऊद बोलत होता. त्याच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात घेऊन समरने तातडीने दिल्ली, मुंबई, पुणे, कलकत्ता अशा सगळ्या प्रमुख शहरांमधील साथीदारांना फोन लावून स्वामींबाबतची प्राथमिक माहिती घेतली. त्यांना ‘डिटेल्स’ काढून ठेवायला सांगितले. समरच्या हाती आलेली माहिती धक्कादायक होती. स्वामी या भूतलावरील महान व्यक्ती होती. त्यांच्या अध्यात्मिक, बौद्धीक शक्तीच्या बळावर विश्वबंधुत्वाची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यांच्यामुळे हिंदुस्थानची किर्ती जगभर पसरली होती. स्वामींचे काम महान होते. ओजस्वी वाणी लाभलेल्या स्वामींचे नाव देशातील तेजस्वी व्यक्तिमत्वांमध्ये अमर झाले होते. या महान विभूतीबाबत बॉसचे काय काम असेल हे ही त्याला समजले नाही. त्याने तातडीने बॉसला फोन करून स्वामींची माहिती कळवली. ती ऐकून दाऊद स्तंभितच झाला. इतके दिवस आपल्याविरोधी काम करण्याच्या सुपाºया प्रतिस्पर्धी ‘उद्योजक’ देत होते हे त्याला माहिती होते. पण, महान व्यक्तिमत्वाशी आपली तुलना करून अप्रत्यक्षरीत्या आपल्याविषयी चांगले बोलायला आपल्या अपरोक्ष ही कोणी आणि का सुपारी दिली असावी हे काही त्याला उमगले नाही. काही का असेना पण एवढ्या वर्षांनी महान व्यक्तीसोबत आपले नाव छापून आल्याने तो हर्षभरीत झाला.
दरम्यान, कोलकत्याच्या चॅटर्जीची माणसे निरनिराळ्या आश्रमांत पोचली. बॉसला ‘फर्स्ट हॅन्ड इन्फर्न्मेशन’ देण्यासाठी त्यांनी स्वामींची माहिती असलेले ग्रंथ घ्यायच्याऐवजी पाच-सात स्वामींनाच उचलले. थेट, त्यांनाच बॉससमोर पेश करून मुख्य स्वामींची माहिती देण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, मुंबई, दिल्ली, कोलकत्याचे अनेक फोन खणखणू लागले होते. भारतातील फोन लाइन्स जाम झाल्या. बॉसला स्वामींची फुल्ल डिटेल देण्यासाठी सगळेजण धडपडत होते. पण, त्यांचे फोन जाण्यापूर्वीच अमेरिका, चीनमधील मित्रांचे दाऊदला फोन गेले. त्यांनी जगभरात दिगंत किर्ती असलेल्या स्वामींची महती त्याला समजावून सांगितली. त्यांच्या नखाजवळ उभे राहण्याचीही आजही कोणाची लायकी नाही हे सांगताना त्यांना काहीसे अवघड वाटत होते. पण त्या महान व्यक्तीसाठी त्यांनी ती ‘रिस्क’ घेतलीच.सकाळपासून धक्क्यांवर धक्के पचवत असलेल्या दाऊदची आता मात्र मतीच गुंगच झाली. दिवाळीच्या सुमारास जीवनाला कलाटणी मिळेल, असे भविष्य अफगाणीस्तानमधील एका वृद्धेने काचेच्या गोलात बघून त्याला सांगितले होते. त्यावेळी त्याला ‘धर्मात्मा’मधील फिरोझ खानचाच सीन आठवला होता. ते भविष्य तो विसरूनही गेला होता. पण,आज सकाळपासून त्याला प्रचिती येऊ लागली होती. भविष्यकाळ पुरता उज्वल असल्याचे त्याच्या लक्षात आले. उर अभिमानाने दाटून आला. शरीर खूप हलके हलके झाले. मन उल्हासित झाले.आता हर्षवायूच होतो की काय असे त्याला वाटू लागले. त्या गडबडीत त्याने दोन ओळी कागदावर खरडल्या. जगाच्या कानाकोपºयातील निरनिराळ्या देशांतील ‘उद्योजकांचे’फोन त्याला येऊ लागले. सर्वांकडून झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावाखाली दाऊद दबून गेला. आपली सारी पापे जणू माफ झाली अशा भावनेने त्याच्या मनात हर्ष उंचबळून आला. आपल्या नावापुढे संत, स्वामी, हभप अशी नावे तो मनोमन जोडून पाहू लागला. थोडक्या वेळेत खूप फोनाफोनी झाल्याने आणि हर्षोतिरेकाने त्याला घेरी आली. भुईवर पडतानाच त्याने मगाशी खरडलेला कागद पीएकडे सोपवला. दाऊद झोपी गेला. त्याचा डोळा लागण्यापूर्वीच त्याचे ‘उद्योजक’ मित्र भलाथोरला गुच्छ, जंबो पेढ्यांचा जंबो पेटारा घेऊन आणि कराचीत यायचे आवतन घेऊन नितीन भाऊंच्या महाल परिसरातील वाड्यावर पोचले होते.

No comments:
Post a Comment