'ती' नजर . . . .
- - - -- - - - - - -
अजून आठवतंय .. . .असंच रणरणतं उंन... पुण्यातले रस्ते ओस पडायचे दुपारी.... त्या तसल्या उन्हात वेड्यासारखा वाट बघायचो मी तासोनतास....जंगली महाराजांच्या देवळात कसं छान वाटायचं..शांत..आणि थंडही...तिथंच पाताळेश्वराच्या लेण्यांत छान् गप्पा चालायच्या आपल्या...अख्खा रस्ता उन्हाळ्यामुळे सुनसान झालेला... बाजूच्या झाडांच्या गर्द सावलीतून मस्त भटकायचो आपण...कुठंतरी शहाळी प्यायचो...नीरा प्यायचो . .. . मस्तानी तर ठरलेलीच...अख्खा दिवस या रस्त्यावर अक्षरश: उंडरायचो...'एसपी'च्या एरीयात इंचाइंचावर लोक आपल्याला ओळखायला लागलेले..म्हणून आपण जरा इकडे सरकलेलो...काही दिवसांसाठी...पण मला वाटतंय...टिळक रोड सुटला ना तेव्हाच ओळखायला पाहिजे होतं आपण....प्रत्येक चांगली-वाईट घटना घडताना त्याच्याशी संबंधीत खाणाखुणा आधी जाणवतात असं म्हणतात...आता मागे वळून पाहिल्यावर मला वाटतं एसपी...टिळक रोड सोडावा लागला ना ती आपल्या नात्याची वीण सैल होण्याची पूर्वसूचना असावी...तुलाही समजली नाही ...मलाही नाही....आपण आपल्याच विश्वात मग्न ...पण मग एकेक धागे उसवायला लागले..वीण ढिली व्हायला लागली...घरनं फोन आले तुझ्या..ताबडतोब निघून ये..कारण...काहीच समजल नव्हतं तेव्हा....तू ही गेलीस एकाएकी ...एसटीत बसल्यावर डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं तुझ्या आणि माझ्याही...कसंबसं बाय केलं तुला....तेव्हा कुठं माहिती होतं ?....हा अखेरचाच बाय....पुढं बरंच काही घडलं...बरंच रामायण झालेलं तुझ्या घरी आणि तुझं 'शुभ' मंगलही....वेडा झालो मी.....सगळे मित्र-मैत्रिणी गडबडलेच...एखाद्याच्या घरंच कुणी गेलं की कसे सांत्वनाला येतात ना लोक..तसे ते यायचे माझ्याकडं....नुसतं रस्त्यावरून चाललो की लोक सहानुभूतीने बघायचे...मलाच असल्या नजरांचा कंटाळा आलेला.. पण करायचं काय?? कुणीतरी टूम काढली ट्रीपला जायची...तेवढंच मन रमेल म्हणून...लोणावळा...माथेरान ...पाचगणी...म्हणायची कुणाची हिम्मतच नव्हती...पुण्यात नाही तेवढ्या आठवणी तिथं रुजलेल्या...विक्रम म्हणाला चला आदिवासी भाग बघून येऊ...निघालो मग तिकडं....गाडीत मस्त कॅसेट घेतलेल्या....गमों के बादशाह...गझल्स वगैरे सीडी फेकून दिलेल्या आणि कोळीगीतं...अटम सॉंग वगैरेचा दणदणाट सुरू ...
जव्हार, मोखाडा, विक्रमगड....कधी इकडं आलेलोच नव्हतो...पण छान एरीया....आदिवासी पाडे सगळे...दुपारचं ऊन सरलं की ही आदिम जमातीतली ....हो आदिवासी मंडळी एकत्र यायची...गप्पा...मोहाची दारू... शिकार केलेल्या ताज्या मटणाचं जेवण....आणि तारपा नृत्य....कल्लाच होता सगळा....काळे सावळे लंगोटी नेसलेले..बसक्या नाकाचे आदिवासी लोक आणि तशाच त्यांच्या स्त्रियाही....लाकडाचे दागिने घातलेल्या...कमी कपड्यातल्या..जैत रे जैत आठवला....शेणा-मातीनं सारवलेली, गेरूनं रंगवलेली त्यांची घरं...तांदळाच्या पिठीने काढलेली सुरेख चित्रं....त्यांची भाषा...सगळंच वेगळं होतं....जगरहाटीपासून पूर्ण भिन्न असलेलं त्यांच जीवन पाहून निराळा विचार करायला लागलो...मोहाच्या मद्यात झिंगून मन आणि शरीर दमवणा-या तारपा नृत्यात आम्हीपण नाचलेलो...सगळं सगळं विसरून गेलो...मनातले ताण -तणाव, दु:ख, अपेक्षाभंग...निराशा..औदासि न्य....सारं सारं निघून गेलं....आगळ्या विश्वात मन रमून गेलं..जीवाला बरं वाटलं....मित्रही खुष झाले..खरंच पन्नो...ते दिवसच छान होते...दिवसभर पाडे बघत भटकायचं...धबधब्याजवळ जायचं...डोंगर-द-या पालथ्या घालायच्या...पाखरांमागं धावायचं...पण मग एकदा तिथल्या शाळेजवळून चाललो होतो...12-14 वर्षांची ती किशोरवयीन मुलगी दप्तर घेऊन बहुदा शाळेतूनच चालली होती....एका हातात गवताचा भारा होता..काळा-सावळा पण चमकदार वर्ण...नाकात चमकी आणि काजळभरल्या डोळ्यांची निरागस पण तेज नजर...तिच्याशी नजरानजर झाली आणि त्या खोल डोहात बुडालेल्या नजरेत तू मला दिसलीस.......गवताच्या भा-याने समोर बसलेला होल्यांचा थवा तिने उडवला... लयदार गिरक्या घेत ते होले नभात उडाले.....त्यांच्या त्या मनोहारी आकृतीमध्ये मला तू दिसलीस....पाड्यावरची तरूण गर्भार स्त्री संथ पण एकालयीत चालत दवाखान्यात निघालेली....तिच्या त्या लयीत मला तुझी चाल सापडली. . .. डोहाच्या बाजूला काही स्त्री पुरुष मासेमारी करीत होते...एकीच्या दंडावरची तांब्याची मासोळी उन्हाने चमकली. .. .मला तुझे डोळे आठवले......पाड्यासमोरच्या मैदानात त्या रात्री मी चांदण्या मोजत झोपलेलो... ....चंद्राशेजारची शुक्राची चांदणी लकाकत होती...प्रकाशाच्या आभेनं चंद्राभोवती खळं झालेलं....मला तुझी 'डिम्पल' आठवली......
आदिवासी पाड्यातून थेट आम्ही पक्याच्या गावी नागपूरला आलो....कऽऽसलाऽऽऽऽ जीवघेणा उन्हाळा....घरोघरी कूलर्स लावलेले.... हिंगणा रोडवर फिरत फिरत रायसोनी कॉलेजला गेलो....रामदास पेठेतलं शिवाजी सायन्स कॉलेजही बघून आलो...तिथल्या पोट्ट्यांचे घोळके बघून आपलं पुण्याचं एसपी आठवलं. कस्तुरचंद पार्कजवळ भटकत होतो...मॉरीस कॉलेजच्या दारावरून पुढे गेलो अन् स्टॉपवर मुलींच्या घोळक्यात मला तुझा चेहरा दिसला.....उन्हं कलली तेव्हा महाराज बागेच्या भागात बुचाच्या फुलांचा अक्षरश: सडा पडला होता....मंद सुवासानं उन्हाची काहीली काहीशी हलकी झाली. रस्त्यावरचं एक फूल घेऊन हुंगलं....त्या गंधाने तुझी याद आली. आधीच वैतागलेला जीव त्या उन्हाळी हवेत आणखी कासावीस झाला....फुटाळा तलावानजिक कितीतरी भटकलो....कुणीतरी छोटा दगड पाण्यात भिरकावला....मस्त गोल...गोल...तरंग पाण्यात तयार झाले....अस्मानी रंगाच्या त्या तरंगांचा वेध घेताना त्यात तू मला दिसलीस... अमरावती रस्त्याने असाच फिरत होतो....रखरखीत उन्हामध्ये तिथल्या गल्ल्यांमध्ये अधूनमधून झाडांची शीतल छाया सुखावत होती....तुझ्या स्पर्शाची आठवण करून देत होती.....सीताबर्डीतल्या सिनेमॅक्स मॉलमध्ये गेलो...वेड्यासारखी खूप खरेदी केली...कपडे घेतले...गॉगल्स घेतले....परफ्यूम घेतले....तिथून बाहेर पडतानाच एका पोट्टीनं फवारलेल्या 'टी रोझ'नं तुझी याद दिली.......
सुन्यानं थेट कोल्हापूरचीच वाट धरायचं फर्मान काढलं . . .व-हाडातल्या उष्म्यातून जरा कोल्हापूरच्या हवेत बरं वाटायला लागलं....रंकाळ्यावर चक्कर मारली की मन कसं प्रफुल्लीत व्हायचं....मिरजकर तिकटीवर धारोष्ण दूध पिऊन हुषारी यायची...कवाळा नाका, राजारामपुरी, शालीनी पॅलेस...मस्त भटकंती चालायची......छान रमलो तिथं....सकाळ-संध्याकाळी महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो...एका सकाळी देवीच्या डोळ्यांत खूप दयार्द भाव जाणवले ...मन:स्थिती जाणली बहुदा तिनं...तिच्या त्या स्नेहभरीत डोळ्यांनी खूप खूप शांत वाटायला लागलं....मंदिरातून बाहेर पडलो...लक्ष्मीपुरीतून पुढे चाललो असताना वाटेत एक वासरू गायीला लुचत होतं....गायीच्या डोळ्यांतले अपार वात्सल्याचे भाव पाहून मला तू आठवलीस.....
गाडीत पोरांचा धांगडधिंगा चाललेला....थेट मुरूड आल्यावरचं गाडी थांबली.....भोगेश्वर पाखाडीत शिरतानाच कसायेस पोरा? म्हणत बयेनं आवाज दिला....त्या बयेच्या काळजीच्या स्वरात तू मला आठवलीस....मारुती कोप-यावर संध्याकाळी पप्पूशेठबरोबर मस्त गप्पांचा फड रंगला होता....कोळीणी मासे घेऊन बाजारात चाललेल्या....एकीच्या हातात चमकदार कांतीच्या सुरमई ....मागून एक कसाई बकरी घेऊन चाललेला ..बहुदा बाजारातच....काळ्याभोर कांतीची ती बकरी बेऽबेऽ करत त्याच्या मागून फरफ़टत चालली होती. माझ्याजवळून जात असताना मी तिच्यावर अलवार हात फिरवला...तिनं मुंडी वळवली..... तिचे डोळे जणू माझाच वेध घेत होते....डोळ्यांतली जान हरवली होती....मला त्या दिवशीचे एसटीतले तुझे डोळे आठवले...बहुदा तुला जाणीव झालेली ....मी कोसळतोय. .
- - - -- - - - - - -
अजून आठवतंय .. . .असंच रणरणतं उंन... पुण्यातले रस्ते ओस पडायचे दुपारी.... त्या तसल्या उन्हात वेड्यासारखा वाट बघायचो मी तासोनतास....जंगली महाराजांच्या देवळात कसं छान वाटायचं..शांत..आणि थंडही...तिथंच पाताळेश्वराच्या लेण्यांत छान् गप्पा चालायच्या आपल्या...अख्खा रस्ता उन्हाळ्यामुळे सुनसान झालेला... बाजूच्या झाडांच्या गर्द सावलीतून मस्त भटकायचो आपण...कुठंतरी शहाळी प्यायचो...नीरा प्यायचो . .. . मस्तानी तर ठरलेलीच...अख्खा दिवस या रस्त्यावर अक्षरश: उंडरायचो...'एसपी'च्या एरीयात इंचाइंचावर लोक आपल्याला ओळखायला लागलेले..म्हणून आपण जरा इकडे सरकलेलो...काही दिवसांसाठी...पण मला वाटतंय...टिळक रोड सुटला ना तेव्हाच ओळखायला पाहिजे होतं आपण....प्रत्येक चांगली-वाईट घटना घडताना त्याच्याशी संबंधीत खाणाखुणा आधी जाणवतात असं म्हणतात...आता मागे वळून पाहिल्यावर मला वाटतं एसपी...टिळक रोड सोडावा लागला ना ती आपल्या नात्याची वीण सैल होण्याची पूर्वसूचना असावी...तुलाही समजली नाही ...मलाही नाही....आपण आपल्याच विश्वात मग्न ...पण मग एकेक धागे उसवायला लागले..वीण ढिली व्हायला लागली...घरनं फोन आले तुझ्या..ताबडतोब निघून ये..कारण...काहीच समजल नव्हतं तेव्हा....तू ही गेलीस एकाएकी ...एसटीत बसल्यावर डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं तुझ्या आणि माझ्याही...कसंबसं बाय केलं तुला....तेव्हा कुठं माहिती होतं ?....हा अखेरचाच बाय....पुढं बरंच काही घडलं...बरंच रामायण झालेलं तुझ्या घरी आणि तुझं 'शुभ' मंगलही....वेडा झालो मी.....सगळे मित्र-मैत्रिणी गडबडलेच...एखाद्याच्या घरंच कुणी गेलं की कसे सांत्वनाला येतात ना लोक..तसे ते यायचे माझ्याकडं....नुसतं रस्त्यावरून चाललो की लोक सहानुभूतीने बघायचे...मलाच असल्या नजरांचा कंटाळा आलेला.. पण करायचं काय?? कुणीतरी टूम काढली ट्रीपला जायची...तेवढंच मन रमेल म्हणून...लोणावळा...माथेरान
जव्हार, मोखाडा, विक्रमगड....कधी इकडं आलेलोच नव्हतो...पण छान एरीया....आदिवासी पाडे सगळे...दुपारचं ऊन सरलं की ही आदिम जमातीतली ....हो आदिवासी मंडळी एकत्र यायची...गप्पा...मोहाची दारू... शिकार केलेल्या ताज्या मटणाचं जेवण....आणि तारपा नृत्य....कल्लाच होता सगळा....काळे सावळे लंगोटी नेसलेले..बसक्या नाकाचे आदिवासी लोक आणि तशाच त्यांच्या स्त्रियाही....लाकडाचे दागिने घातलेल्या...कमी कपड्यातल्या..जैत रे जैत आठवला....शेणा-मातीनं सारवलेली, गेरूनं रंगवलेली त्यांची घरं...तांदळाच्या पिठीने काढलेली सुरेख चित्रं....त्यांची भाषा...सगळंच वेगळं होतं....जगरहाटीपासून पूर्ण भिन्न असलेलं त्यांच जीवन पाहून निराळा विचार करायला लागलो...मोहाच्या मद्यात झिंगून मन आणि शरीर दमवणा-या तारपा नृत्यात आम्हीपण नाचलेलो...सगळं सगळं विसरून गेलो...मनातले ताण -तणाव, दु:ख, अपेक्षाभंग...निराशा..औदासि
आदिवासी पाड्यातून थेट आम्ही पक्याच्या गावी नागपूरला आलो....कऽऽसलाऽऽऽऽ जीवघेणा उन्हाळा....घरोघरी कूलर्स लावलेले.... हिंगणा रोडवर फिरत फिरत रायसोनी कॉलेजला गेलो....रामदास पेठेतलं शिवाजी सायन्स कॉलेजही बघून आलो...तिथल्या पोट्ट्यांचे घोळके बघून आपलं पुण्याचं एसपी आठवलं. कस्तुरचंद पार्कजवळ भटकत होतो...मॉरीस कॉलेजच्या दारावरून पुढे गेलो अन् स्टॉपवर मुलींच्या घोळक्यात मला तुझा चेहरा दिसला.....उन्हं कलली तेव्हा महाराज बागेच्या भागात बुचाच्या फुलांचा अक्षरश: सडा पडला होता....मंद सुवासानं उन्हाची काहीली काहीशी हलकी झाली. रस्त्यावरचं एक फूल घेऊन हुंगलं....त्या गंधाने तुझी याद आली. आधीच वैतागलेला जीव त्या उन्हाळी हवेत आणखी कासावीस झाला....फुटाळा तलावानजिक कितीतरी भटकलो....कुणीतरी छोटा दगड पाण्यात भिरकावला....मस्त गोल...गोल...तरंग पाण्यात तयार झाले....अस्मानी रंगाच्या त्या तरंगांचा वेध घेताना त्यात तू मला दिसलीस... अमरावती रस्त्याने असाच फिरत होतो....रखरखीत उन्हामध्ये तिथल्या गल्ल्यांमध्ये अधूनमधून झाडांची शीतल छाया सुखावत होती....तुझ्या स्पर्शाची आठवण करून देत होती.....सीताबर्डीतल्या सिनेमॅक्स मॉलमध्ये गेलो...वेड्यासारखी खूप खरेदी केली...कपडे घेतले...गॉगल्स घेतले....परफ्यूम घेतले....तिथून बाहेर पडतानाच एका पोट्टीनं फवारलेल्या 'टी रोझ'नं तुझी याद दिली.......
सुन्यानं थेट कोल्हापूरचीच वाट धरायचं फर्मान काढलं . . .व-हाडातल्या उष्म्यातून जरा कोल्हापूरच्या हवेत बरं वाटायला लागलं....रंकाळ्यावर चक्कर मारली की मन कसं प्रफुल्लीत व्हायचं....मिरजकर तिकटीवर धारोष्ण दूध पिऊन हुषारी यायची...कवाळा नाका, राजारामपुरी, शालीनी पॅलेस...मस्त भटकंती चालायची......छान रमलो तिथं....सकाळ-संध्याकाळी महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचो...एका सकाळी देवीच्या डोळ्यांत खूप दयार्द भाव जाणवले ...मन:स्थिती जाणली बहुदा तिनं...तिच्या त्या स्नेहभरीत डोळ्यांनी खूप खूप शांत वाटायला लागलं....मंदिरातून बाहेर पडलो...लक्ष्मीपुरीतून पुढे चाललो असताना वाटेत एक वासरू गायीला लुचत होतं....गायीच्या डोळ्यांतले अपार वात्सल्याचे भाव पाहून मला तू आठवलीस.....
गाडीत पोरांचा धांगडधिंगा चाललेला....थेट मुरूड आल्यावरचं गाडी थांबली.....भोगेश्वर पाखाडीत शिरतानाच कसायेस पोरा? म्हणत बयेनं आवाज दिला....त्या बयेच्या काळजीच्या स्वरात तू मला आठवलीस....मारुती कोप-यावर संध्याकाळी पप्पूशेठबरोबर मस्त गप्पांचा फड रंगला होता....कोळीणी मासे घेऊन बाजारात चाललेल्या....एकीच्या हातात चमकदार कांतीच्या सुरमई ....मागून एक कसाई बकरी घेऊन चाललेला ..बहुदा बाजारातच....काळ्याभोर कांतीची ती बकरी बेऽबेऽ करत त्याच्या मागून फरफ़टत चालली होती. माझ्याजवळून जात असताना मी तिच्यावर अलवार हात फिरवला...तिनं मुंडी वळवली..... तिचे डोळे जणू माझाच वेध घेत होते....डोळ्यांतली जान हरवली होती....मला त्या दिवशीचे एसटीतले तुझे डोळे आठवले...बहुदा तुला जाणीव झालेली ....मी कोसळतोय. .
No comments:
Post a Comment