अन् गहिवरला स्वर्गलोक
- - - - - - - - - - - - - - - - -
.खुद्द "साहेबां'चे प्राण घेऊन यमराजाने प्रयाण केल्याचे समजताच स्वर्गलोकात एकच धांदल उडाली. खुद्द पापपुण्याचा हिशेब करणारा चित्रगुप्तही गडबडला. देवाधिराज इंद्राने सर्व देवांची तातडीची सभा बोलवली.हातातली कामे टाकून एकजात सगळे तातडीने हजर झाले. सगळ्यांच्याच कानावर "ते' अशुभ वर्तमान आले होते.आता पुढे काय? याकडे सा-यांचेच लक्ष लागले होते.
सभेला सर्वजण आल्याचा संदेश दुताने दिल्यावर देवाधिराज इंद्राने दरबारात प्रवेश केला. सर्वांना वंदन करून सभा सुरू करण्याचा इशारा केला. त्यापाठोपाठ सारे देवगण आसनस्थ झाले. इंद्रदेवाचा प्रत्येक शब्द ऐकण्यास सर्वांचे कान आतूर झाले होते. सर्वांना नमन करून शांत,धीरगंभीर आवाजात इंद्रदेवाने बोलण्यास सुरुवात केली..." यमराज स्वर्गलोकांकडे येत असल्याचे वर्तमान नुकतेच समजले आहे. अत्यंत विमनस्क मन:स्थितीत असलेले यमराज सध्या काहीएक बोलू शकत नाहीत. व्यक्तिश: मला या घटनेने अनेक गोष्टींचा खुलासा करणे भाग आहे. मला कोणतीही गोष्ट दडवून ठेवायची नव्हती. पण, स्वर्गलोकाच्या नियमानुसार आणि राजा म्हणून असलेल्या माझ्या अधिकाराच्या बळावर मी काही निर्णय गोपनीय ठेवले होते. अर्थात, तमाम जनतेच्या भल्यासाठी मी घेतलेल्या त्या निर्णयांना तुम्हा सर्वांचाच पाठिंबा राहील याची पूर्ण खात्री मला होती आणि आहे.आता त्यापैकी एका निर्णयाची माहिती देण्याची वेळ आली आहे. यमराज "साहेबांना'' घेऊन निघाले आहेत. कोणत्याही क्षणी ते येथे पोचतील. तत्पूर्वी हे निवेदन मला संपवायचे आहे.''
मुळात यमराजांनी येण्यापूर्वीच मला एक संदेश धाडला आहे. यापुढे त्यांचे काम मी अन्य कोणाकडे तरी सुपूर्द करावे, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. पृथ्वीतलावरून आजवर त्यांनी कितीतरी प्राण आणले. अगदी कोवळ्या निरागस बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत. चौसष्ठ कलांमध्ये निपुण असलेल्या कलाकारांपासून ते साहित्य, क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांतील श्रेष्ठ व्यक्तींचे प्राण त्यांनी आणले. काळपुरुषाच्या आज्ञेनुसार. प्रत्येक वेळी त्यांनी संबंधित व्यक्तींच्या आप्तस्वकियांचे दु:ख जवळून पाहिले. त्यांच्या सुहृदांचे हंबरडे ऐकून यमराजांचेही हृदय द्रवले. पण, आज एवढा ताण त्यांना यापूर्वी कधी आला नव्हता. यापुढे हे कामच नको, असा त्यांचा ठाम निर्धार आहे. साहेबांच्या प्राण आणण्याच्या अतिताणामुळे मानसिकदृष्ट्या ते खचले आहेत. त्यांची जराही इच्छा नव्हती. पण, काळपुरुषापुढे त्यांचा नाईलाज झाला. पृथ्वीतलावरील भारत देशामध्ये
राहणा-या आणि तमाम मराठी लोकांचे साहेब असलेल्या बाळासाहेबांचे प्राण आणण्यासाठी यमराज यापूर्वी काहीवेळा गेले होते. पण, सर्व थरातील, सर्व क्षेत्रातील मान्यवरांची, सर्वसामान्य नागरिकांची साहेबांवर असलेली निस्सीम भक्ती पाहून यमराज अचंबित झाले. या माणसावर प्रेम करणा-यांची लाखोंची संख्या पाहून ते चकीत झाले. साहेबांचा ध्यास, त्यासाठी त्यांनी केलेला पराकोटीचा संघर्ष केवळ अतुलनीय आहे. लाखो सामान्य नागरिकांनी साहेबांच्या आजारपणात चक्क देव पाण्यात घातले होते. त्यांची ती कडवी निष्ठा आणि सर्वधर्मीयांनी केलेल्या मन:पूर्वक प्रार्थनेमुळे यमराजांना माघार घ्यावी लागली होती. अगदी दोन दिवसांपूर्वीही यमराजाने त्यांना गाठले होते. त्यावेळी साहेबांजवळ साक्षात स्वरलता, बिगबीआमिताभ, क्रिकेटचा देव सचिन यांच्यासारखे कितीतरी जबरदस्त चाहते शोकाकूल झाल्याचे पाहून यमराज गडबडले. त्यांनी पुन्हा साहेबांमध्ये प्राण फुंकले आणि दिवाळीपेक्षाही मोठी दिवाळी मराठी माणसाने साजरी केली.' 'देवगण शांतपणे इंद्रदेवाचे निवेदन ऐकत होते. काय केलं नाही साहेबांनी मराठी माणसासाठी?बेळगावच्या प्रश्नासाठी कडवा संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कारावास भोगला. मुंबईत मराठी माणसाची पत कायम ठेवण्यासाठी संघर्ष केला. भगवा झेंडा खांद्यावर घेऊन हिंदू धर्माच्या पताकेची शान वाढवली. मुंबईत, महाराष्ट्रात जेथे जेथे मराठी माणसापुढे समस्या निर्माण झाली; तेव्हा तेव्हा तन, मन, धनाने साहेब त्यांच्या मदतीला धावून गेले. सर्वसामान्य मराठी जनतेचे कैवारी बनले. बहुतेकांना सत्ता आली की लोभ सुटतोच. पण, साहेब त्यापासून कटाक्षाने दूर राहिले. शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आली. मुख्यमंत्री तर ते सहज झाले असते. त्यापेक्षाही मोठ्या पदांची ऑफर त्यांना तत्पूर्वी अन्य पक्षांनी दिली होती. पण,या माणसाला कुठे आला हो सत्तेचा लोभ!ते सत्तेपासून दूरच राहिले. सारी पदे त्यांनी जवळच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये वाटून टाकली. कसला,कसला काडीचाही मोह ठेवला नाही या माणसानं. त्यामुळं तर तो सर्वसामान्यांना आपला "साहेब' वाटला. त्यांच्या एका इशा-यासरशी सारा महाराष्ट्र बंद व्हायचा. त्यांच्या नजरेच्या एका कटाक्षासरशी समोरचा माहोल बदलायचा. अन्याय करणा-यांना कोपराढोपरापासून सोलून काढायचे त्यांचे शिलेदार.त्यामुळे माता-भगिनींना साहेबांचा मोठा आधार. राखी पौर्णिमेला हजारो राख्या "मातोश्री' वर यायच्या. भाऊबीजेला हजारो बहिणी साहेबांना मनोमन ओवाळायच्या. माणसांच्या प्रेमामुळे, स्नेहामुळे आणि निष्ठेमुळे साहेब केवळ मुंबईचेच नव्हे, तर तमाम महाराष्ट्राचे "सरकार'' बनले. कुणीही त्याच्याकडे गा-हाणे घेऊन विश्वासाने जावं. साहेब ताबडतोब निकाल लावायचे. कसलाही प्रश्न असो, वा कोणतीही समस्या; प्रत्येकाचा इलाज साहेबांकडे होता. पण, त्यामुळं कधी मत्त झाले नाही साहेब. लोकांचे अपार प्रेम पाहून ते गहिवरून जात. प्रेमाने ओथंबलेल्या स्वरांतून जेव्हा ते "माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनी आणि मातांनो...' अशी साद घालायचे ना तेव्हा हजारो माता-भगिनींचा उर दाटून यायचा. आता खड्या आवाजातील ही साद कोण घालणार?'' इंद्रदेवाच्या या सवालाचे उत्तर कोणाकडेही नव्हते.
समस्त देवगण इंद्रदेवाचेनिवेद नस्तब्धपणे ऐकत होते. अनेकांचे डोळे पाणावले.हुंदके दाटून आले.मने गहिवरली. इंद्रदेव पुढे बोलू लागले... साहेब, केवळ राजकारणी नव्हते. त्यांचे समाजकारण मोठे होते. सर्व क्षेत्रात चांगला दोस्ताना होता. राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी त्यांचे जवळचे मित्र होते. देशविदेशातील कलाकार, साहित्यिकांशी त्यांनी मैत्र जपले. मराठी सारस्वताभोवती कायम मैत्रीचे कवच उभारले. क्रीडापटू, कलाकारांना आश्वस्त ठेवले. तळागाळातील जनतेला आपलेसे केले. भांडवलशहांना कायम त्यांची जागा दाखवली. मराठी माणसाची अस्मिता जपली.त्यांची शान वाढवली. महाराष्ट्राचा डंका जगभर पिटला. मराठी माणसाच्या हितासाठी झटणा-यांना कायम डोक्यावर घेतले. साहेबांनी आयुष्यभर जगदंबेचं स्मरण केलं. मराठी माणसावर गारूड केलेल्या या साहेबांनी कितीतरी अचाट चमत्कार करून दाखवले. एका शब्दावर जनमताचा कौल फिरवून दाखवला.किती,किती कर्तृत्व सांगावं या माणसाचं? '' बोलता बोलता इंद्रदेव अचानक स्तब्ध झाले.एकवार त्यांनी उपस्थित देवगणाकडे नजर फिरवली. क्षणभर डोळे मिटले. सर्वांची उत्सुकता ताणली गेली. मनात शब्दांची जुळवाजुळव करीत ते
म्हणाले ,''अरे हो... एक सांगायचं राहूनच गेलं... हे साहेब म्हणजे मनुष्य नव्हताच मुळी. अहो तो तुमच्या आमच्यासारखाच एक देव होता. मराठी जनतेच्या उद्धारासाठी आम्हीच मनुष्यरूप देऊन त्यांना पृथ्वीतलावर पाठवलं होतं. साक्षात देव असल्याने "साहेबां' ना मरण नाही.पृथ्वीतलावर त्यांचे चाहते शोक करीत आहेत. त्याबद्दल आम्हाला कमालीचं वाईट वाटतंय. पण, काय करायचं!त्यांच्या मनुष्यरूपाची मुदत खरंतर केव्हाच संपली होती आणि देवलोकांत आम्हाला त्यांची सारखी उणीव भासतेय. म्हणूनच या देवाला आम्ही बोलावून घेतलं आहे.....''
इंद्रदेव बोलत असताना उपस्थित देवांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. तिकडे बाळासाहेबांच्या देहातून साक्षात जगदंबा प्रकट झालेली पाहून आधीच भीतीने काळवंडलेले यमराज मूर्च्छीत पडले.....
—- - - - - - - - - - - - - - - - -

No comments:
Post a Comment