काहीतरी गल्लत करतोयस तू Amit Namjoshi ....कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रार्थना स्थळात का जाते? याचं उत्तर अंदाज अपना अपना किंवा मर्जी ज्याची त्याची....असं आहे .....नमाज घरातल्या चार भिंतीतही अदा करता येते..आणि मशिदीत जाऊनही...देवपूजा घरातही करता येते आणि मंदिरातही....बसल्या जागेवरून येशूचं स्मरण करू शकतो आणि चर्चमध्ये जाऊनही....तरीही लोक तिथं का जातात? कित्येकांना अशा धार्मिक स्थळी गेलं की मन:शांती लाभते....मला तर 100 टक्के.....मग ते मंदीर, दर्गा, चर्च, अथवा कोणतंही प्रार्थनास्थळ असो.....महालक्ष्मीच्या फोटोला घरात हार घालून जे समाधान मिळतं ना तेच...प्रत्यक्ष कोल्हापुरातील मंदिरात जाऊन मिळतं....पण एक नक्की की तिथल्या गाभा-यात गेलं की एक अनामिक शक्तीचं अस्तित्व नक्कीच जाणवतं......एवढ्या पुरातन मंदिरात वास असलेल्या महालक्ष्मीचं तिथं दर्शन घेण्यातील आनंद और असतो....त्याला काही धार्मिक अधिष्ठान आहे...काही अध्यात्मिक कारणं आहेत...खूप थोरामोठ्यांचे पाय त्या जागेला लागलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष देवीचंच तिथं वास्तव्य आहे...त्याचा काहीतरी परीणाम तर जाणवणारच ना??? तसंच इतर मंदिरांचं आणि अन्य प्रार्थना स्थळांचंही आहे. संत महात्म्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या त्या ठिकाणी खूप निराळी व्हायब्रेशन जाणवतात...पण त्यातही गोम आहेच....माझा भुताखेतांवर आजिबात विश्वास नाही...अशा शक्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी मी कित्येकदा मुद्दाम जातो....पण कधी तसं अस्तित्व जाणवलं नाही आणि भीतीही कधी वाटली नाही..या विषयावर एका अधिकारी व्यक्तीशी गप्पा मारताना मी भूत नाहीच हे ठामपणे सांगत होतो...त्यावर त्यांचा युक्तिवाद होता की विशिष्ठ योनीत जन्मलेल्या माणसांनाच भुते दिसू शकतात...असेलही कदाचित् तसं....तसंच धार्मिक ठिकाणची व्हायब्रेशन जाणवण्यासाठीही काही विशिष्ठ योनीतच जन्म घ्यावा लागत असावा....ज्यांना जाणवतात त्यांना ती जाणवतात...काही पाषाणासारखे कोरडेच राहतात....मी कुणाच्याही मताचा अनादर करीत नाही....पण मला म्हणायचं कोणी, कशाची, केव्हा भक्ती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचे पप्पा कडवे नास्तिक आणि निरीश्वरवादी आहेत....भलेही त्यांनी पर्यटनाच्या निमित्ताने देशातील कित्येक मंदीरं किंवा सर्वधर्मिय प्रार्थनास्थळं पालथी घातली असावीत....पण त्यांना कुठे हात जोडताना किंवा माथा झुकवताना कधी पाहिलं नाही आणि ते तसे आहेत म्हणून आमच्यावर कधी मोठी संकटं आलीत असंही कधी झालं नाही. उलट, कितीही आणिबाणीच्या प्रसंगांमध्ये ते धीरोदात्तपणे ठाम, खंबीर राहतात हे मी लहानपणापासून जवळून पाहतोय.....जी संकल्पनाच त्यांना मान्य नाही त्यापुढे ते झुकतीलच कशाला...मग ते घरात असो वा दारात किंवा बाहेर!... त्यांना कधी मशिदीत नमाज पडताना पहिलं नाही...त्यांना नमाज येतही नाही आणि त्यांनी तसे कोणतेही धार्मिक संस्कार आम्हा भावंडांवर कधी केले नाहीत...त्यामुळं आम्हालाही येत नाही....पण म्हणून आम्ही कोरडे राहिलोच नाही ना.....मी पोस्तमध्ये म्हटलंय तसं मी, माझा भाऊ खूप काळ पप्पांसारखेच कडवे नास्तिक होतो...पण एका विशिष्ठ वेळेला आम्ही झुकलो त्याबाजूला....पण म्हणून काय दिवसभर आणि रात्रभर काय आम्ही फक्त तेवढंच करत बसत नाही...भय्याला तर काही मोठ्या व्यक्तींचा अनुग्रह प्राप्त झालायं....तो कंपनीत 12 तास काम करतो...मी माझ्या कामाच्या निमित्ताने 10-12 तास बाहेरच असतो....घरात असतो मध्यरात्रीनंतर सकाळी 11पर्यंत....त्यात झोपणार कधी आणि भक्ती करणार कधी??? त्यातही जसा वेळ मिळतो तसं नामस्मरण नक्कीच करतो मी.....कोणत्याही देवपुरुषाची कास धरणं म्हणजे आपलं मन कमकुवत असल्याचं लक्षण आहे हे तुझं मत पटत नाही...उलट एक शक्ती आपल्या पाठीशी आहे या केवळ विचारानेच एखादं दुर्बल मन भक्कम होतं....आपल्यासारख्यांना हुरूप येतो...उत्साह, आत्मविश्वास वाढतो....आपल्याभोवतालचे वलय क्लिअर होते..एक निराळं तेज चेह-यावर दिसतं...देहबोली अधिक सकारात्मक होते...नजरेत चमक येते....आणि हे येण्यासाठी आपण भक्ती करतो का??? तर आजिबात नाही...एक चांगला भाविक बनल्यानंतर या गोष्टी आपोआप तुमच्यात दिसू लागतात....सारासार विचार करण्यासाठी आपल्याला जी अक्कल दिलीये ना! तिची गती मंद झाली, किंवा बुद्धी कुंठीत झाली ना की माणसाचा तोल जायला लागतो....काहीवेळा व्यसनाधीनतेमुळे, वाईट संगतीमुळे विचारशक्ती क्षीण होते....चुकीचे विचार प्रसारीत करू लागते....त्याकाळात ना आपण रक्ताच्या नात्यांची ना दोस्तांची पर्वा करत . .. . अशावेळी या चराचरात भरून राहिलेली इश्वरी शक्तीच सद्मार्गावर नेते...प्रत्येक माणूस जर प्रत्येकाशी माणसासारखा माणुसकीने वागला तर काही प्रश्नच उद्भवणार नाही असं माझे मित्रSanadaish यांनी नोंदवलंय .. . ते खरंच आहे...माणसा माणसा कधी व्हशील माणूस??? असं बहिणाबाईंनी पाच दशकांपूर्वी विचारलं....पण मूळ मुद्दा इथंच आहे, की माणूस माणसासारखा नाही, तर पशुसारखा वागतोय....चार पैशे खिशात खुळखुळायला लागले की चार इंच छाती फुगवून माजात जातो....विद्या विनयेन शोभते हेच माणूस विसरू लागलाय...आपल्याकडे असलेल्या विद्येचा, कलेचा त्याला माज चढू लागलाय...चार ओळी ब-या खरडत्या आल्या किंवा गप्पांमध्ये शब्दांचे खेळ जमू लागले की माणूस सहा इंच उंचावरून चालायला लागतो....आजुबाजूच्या जगाला क: पदार्थ लेखू लागतो....नातीगोती, मित्रांचा त्याला विसर पडू लागतो....आपण तेवढे शहाणे...मी म्हणतो ते आणि तेच् खरं असा अहंकार चिकटतो...तिथं माणसाचा -हास होत जातो...माणसातलं माणूसपण शाबूत ठेवण्यासाठीच त्याला अध्यात्माचं अधिष्ठान महत्वाचं ठरतं. .. .आणखी एक .......महाअवतार बाबाजी त्यांच्या शिष्यांना हिमालयात बोलावून घेतात अशी माहिती त्यांना प्रत्यक्ष ऐकलेल्या, पाहिलेल्या व्यक्तींकडून मिळते...त्यामुळे, तू म्हणतोस ते खरं आहे मित्रा की .खरा सदगुरू त्याच्या शिष्यांना शोधत येतो...असो...जाता जाता एक गंमत सांगतो...माझे आजोबा ब्रिटिश काळात कोल्हापूर विभागाचे शिक्षण अधिकारी होते...अत्यंत पुरोगामी विचारांचे...त्यांनी माझं नाव ठेवलंय-आबिद ...मध्यंतरी उर्दू-मराठी डिकशनरीत मुद्दाम अर्थ पाहिला ....इबादत करनेवाला मीन्स भक्ती करणारा भाविक म्हणजे आबिद .......
No comments:
Post a Comment