आस
- - -- - -
नात्यांच्या गोतावळयात सर्वात श्रेष्ठ नाते मानले जाते ते आइ व मुलाचे. स्वार्थाचा आजिबात लवलेश नसलेल्या नात्यामध्ये असते निव्वळ वात्सल्य. या वात्सल्याच्या अनावर ओढीमध्ये अ़फाट ताकद असते. ताटातूट झालेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आलेल्या अशाच ए़क़ा मातेची करूण कहाणी पंधरा वर्षांनंतरही पोलीस विसरलेले नाहीत.
क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र पाटील व त्यांचा स्टाफ बुचकळयात पडला होता. प्रकरणच काहीसे क्लिष्ट् होते. पतीने आपल्या मुलीचे थेट नॉर्वेहून अपहरण करून पुण्यात आणल्याची तक्रार एका विदेशी युवतीने दिली होती. त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. सध्या सातारा येथे असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र जोशी त्यावेळी म्हणजे फेब्रुवारी १९९७ मध्ये क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते. या प्रकरणाचा गुंता सोडवण्याचा विडा उचलला. सॅंड्रा वॉलेसमार्न आणि तिची सहा वर्षांची मुलगी सन यांच्यातील वात्सल्याच्या अनोख्या अविष्काराचे हे प्रकरण होते.
सॅंड्रा थायलंडमधील सुंदर तरुणी आणि कलाकार. वास्तुशास्त्रामध्ये तिला स्वारस्य होते. इंटेरीयर डेकोरेटर म्हणजे घर सजवून देण्याचा व्यवसाय करण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी तिची धडपड चालली होती. अडचणीची बाब एकच होती, ती म्हणजे तिचा पती अॅस्केल. एका सामाजिक शिबिरात भेटलेल्या नॉर्वेच्या अॅस्केलशी तिने लग्न केले. त्याच्यासमवेत ती ही नॉर्वेला गेली. अॅस्केल आळशी होता. देशभर आणि देशाबाहेर भ्रमंती करण्याची त्याला भलतीच हौस. काम सोडून तो सर्वकाही करायचा. त्यामुळे संसाराचा सारा भार एकट्या अँड्रावर पडायचा. ती नोकरी करायची. घरकाम करायची. मुलीला सांभाळायची, अॅस्केलची हौसमौज भागवायची. त्याची व्यसने सांभाळायची. संसाराच्या या रगाड्यात ती वैतागून गेली होती. त्यातूनच तिचे अॅस्केलशी ख़टके उडायचे. अॅस्केल वाइट होता अशातला भाग नव्हता. पण, तो होता कलंदर वृत्तीचा. संसारात काही त्याचे मन रमत नव्हते. पण संसार तर तो मांडून बसला होता. एकंदर या परीस्थितीमुळे अँड्राची अॅस्कलसमवेत वादावादी वाढली. भांडणे पराकोटीला गेली. आणि एके दिवशी आकस्मिकपणे अॅस्कल छोट्या सनला घेऊन परागंदा झाला.
या प्रकारामुळे अँड्राला कमालीचा धक्का बसला. मानसिकद्ृष्ट्याा ती कोसळली. चिमुरड्या सनचा तिला खूप लळा होता. तिचा प्राणच होती ती. सनशिवाय राहण्याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या जीवाची तलखी सुरू झाली. सनच्या आठवणींनी तळमळत असलेल्या अँड्राने अॅस्केल मुलीला घेऊन परागंदा झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. विदेशातील असले तरी अखेर ते पोलीसच्. अँड्रा सातत्याने पाठपुरावा करीत होती. पण, पोलीस फार काही हालचाली करीत नाहीत असे तिच्या निदर्शनास आले. दिवसांमागून दिवस जात होते. निरनिरा़ळया मित्रांच्या माध्यमातून तिने जगभर सनचा शोध सुरू केला. या घटनेला दोन वर्षे लोटली. पण अँड्राने आशा सोडली नव्हती. सनचा शोध तिच्या जीवनाचा ध्यास बनला होता. सैरभैर झालेल्याअँड्राने ख़ासगी डिटेक्टिव्ह कंपनीची मदत घ्यायचा निर्णय घेतला. ओला टयून हा या संस्थेचा प्रमुख. त्याने पद्धतशीरपणे अॅस्कलचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी मोबाइल दूरध्वनी नव्हते. तसे असते तर अॅस्कलनचा माग काढणे सोपे गेले असते. ओला टयून आणि त्याच्या सहकाºयांनी अॅस्कलची बारीकसारीक माहिती काढली. अॅस्कलच्या आइची त्याच्यावर खूप माया होती. तो आइच्या संपर्कात असणार हा डिटेक्टिव्ह एजन्सीजचा तर्क ख़रा ठरला. त्यांनी अॅलनच्या आइच्या घरी येणाºयावर टपालावर लक्ष ठेवले. पोष्टातून माहिती काढली. अॅस्केलची आइ त्याला अनेकदा मनीआर्डरने पैसे पाठवत होती. त्यावरुन ओला टयुनने अॅस्केलचा माग काढायचा प्रयत्न केला. अॅस्केल चक्क भारतात होता आणि ते ही पुण्यात. तो कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये राहतो येथपर्यत ट्यूनने त्याचा माग काढला. अँड्राने ही माहिती नॉर्वे पोलिसांना दिली. त्यावेळी नॉर्वे आणि भारतामध्ये हस्तांतरण करार नव्हता. त्यामुळे पेच निर्माण झाला. लेकीची आस लागलेल्या अँड्राने इंटरपोलच्या अधिकाºयांची भेट घेतली. आपली मुलगी परत मिळवून देण्याची विनवणी केली. तिची एकंदर कहाणी ऐकून इंटरपोलच्या अधिका-यांनी फेब्रुवारी १९९७ मध्ये भारतीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले. सध्या सातारा येथे नेमणुकीस असलेले पोलिस निरीक्षक राजेंद्र जोशी (मोबाइल क्रमांक ९८२२०५४०००) यांनी कोरेगाव पार्क ज्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे,त्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्यापूर्वी काम केले होते. त्यामुळे, त्यांचा तेथे चांगला संपर्क आहे. त्यांनी सहका-यांच्या मदतीने कोरेगाव पार्क परिसर पिंजून काढला. अखेर, तेथील ‘व्हाइट हाऊस’ या इमारतीमध्ये अॅस्केल राहात असल्याचे त्यांना समजले. तेथून त्यांनी त्याला चिमुरड्या सनसह ताब्यात घेतले.
दरम्यान, ओला ट्यून याच्यासमवेत अँड्राही पुण्यात पोहोचली होती. दोन वर्षे तिची लेकीशी ताटातूट झाली होती. पोलिसांनी अॅस्केलला व सनला तिच्यासमोर उभे केले आणि नजरानजर होताच छोटी सन आईकडे झेपावली. अँड्राच्या डोळयांतून आनंदाश्रू वाहू लागले. एकंदर सारा प्रसंगच गहिवरुन टाकणारा होता. अॅस्केलनेही मग अँड्राला कवेत घेतले. उपस्थित काही पोलिसांनाही त्यावेळी आपले अश्रू लपवता आले नाही. चित्रपटात होतो तसाच या वास्तव जीवनातील घटनेचा शेवट गोड झाला. चार फेब्रुवारी १९९७ ला छोटी सन तिची आई अँड्रा, वडील अॅस्केल, डिटेक्टीव्ह ओला ट्युन आणि त्याचा सहकारी असे पाचजण विमानानो नॉर्वेला रवाना झाले. पंधरा वर्षापूर्वीची ही घटना आठवली की, त्या मोहिमेत सहभागी असलेल्या पोलिसांच्या डोळयाच्या कडा आजही ओलावतात.. .

No comments:
Post a Comment